पीटीआय, पाटणा

बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या जातनिहाय गणनेशी संबंधित प्रत्यक्ष सर्वेक्षण (फील्ड सव्‍‌र्हे) आता पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान ‘बिजाग’ (बिहार जाती आधारित गणना) अ‍ॅपवर गोळा करण्यात आलेली माहितीची डिजिटल नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला राज्यभरातील जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी गती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
forest cover , Sindhudurg district, Western Ghats,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात वाढ तर पश्चिम घाटात घट, चिंतेची बाब
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
land acquisition for shaktipeeth expressway
आठवड्याभरात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात; कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ८२०० हेक्टर जमिनीचे संपादन
mhadas tender for Abhudayanagar redevelopment at Kalachowki
अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी म्हाडाला विकासक मिळेना, प्रतिसादाअभावी चौथ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्कीच
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड

जातीसह १७ कलमी सामाजिक- आर्थिक निर्देशकांबाबतचा नमुना भरण्यासाठी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा आपल्या संबंधित जिल्ह्यात पूर्ण झाला असल्याचा लेखी जाहीरनामा, प्रधान जनगणना अधिकारीही असलेल्या सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला आहे.

डिजिटायझेशनसाठी अ‍ॅप

‘या मोहिमेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या माहितीची डिजिटल नोंदणी करण्यासाठी बिजागा अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. बिहार सरकारचा उपक्रम असलेल्या बिहार राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळाच्या (बेल्ट्रॉन) माध्यमातून सध्या डेटा एंट्रीचे काम करण्यात येत आहे, असे समजते.

Story img Loader