पीटीआय, पाटणा
बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या जातनिहाय गणनेशी संबंधित प्रत्यक्ष सर्वेक्षण (फील्ड सव्र्हे) आता पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान ‘बिजाग’ (बिहार जाती आधारित गणना) अॅपवर गोळा करण्यात आलेली माहितीची डिजिटल नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला राज्यभरातील जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी गती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
जातीसह १७ कलमी सामाजिक- आर्थिक निर्देशकांबाबतचा नमुना भरण्यासाठी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा आपल्या संबंधित जिल्ह्यात पूर्ण झाला असल्याचा लेखी जाहीरनामा, प्रधान जनगणना अधिकारीही असलेल्या सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला आहे.
डिजिटायझेशनसाठी अॅप
‘या मोहिमेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या माहितीची डिजिटल नोंदणी करण्यासाठी बिजागा अॅप तयार करण्यात आले आहे. बिहार सरकारचा उपक्रम असलेल्या बिहार राज्य इलेक्ट्रॉनिक्स विकास महामंडळाच्या (बेल्ट्रॉन) माध्यमातून सध्या डेटा एंट्रीचे काम करण्यात येत आहे, असे समजते.