नवी दिल्ली

काँग्रेसच्या संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक मंगळवारी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार असून विशेष अधिवेशनात पक्षाची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सोमवारी संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. अदानी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता असून संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली जाऊ शकते. याशिवाय, मणिपूर हिंसाचार, चीनची घुसखोरी आदी मुद्दय़ांवरून केंद्राला घेरण्याची तयारी काँग्रेस करत आहे.

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Narendra Modi and Rahul Gandhi Chimur, Chimur,
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…
Assembly Election 2024 Achalpur Constituency Bachu Kadu Mahavikas Aghadi and Mahayuti print politics news
लक्षवेधी लढत: अचलपूर : बच्चू कडूंसमोर चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

अदानी समूहाशी निगडित आर्थिक घडामोडींसंदर्भात गंभीर आरोप करणारा दुसरा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील पत्रकार परिषदेत लक्ष्य केले होते. त्यामुळे विशेष अधिवेशनामध्येही राहुल गांधी व काँग्रेस खासदारांकडून भाजपला अडचणीत आणणाऱ्या मुद्दय़ाला प्राधान्य दिले जाण्याचे संकेत वेणुगोपाल यांनी दिले.

हेही वाचा >>>पाकिस्तानात चर्च, ख्रिश्चन घरांना लक्ष्य करण्यामागे कट; वैयक्तिक वादातून तिघांचे कृत्य

पहिली कार्यकारिणी बैठक हैदराबादमध्ये तेलंगणातील विधानसभा निवडणुकीनिमित्त खरगेंनी नियुक्त केलेल्या कार्यकारिणी समितीची पहिली बैठक हैदराबाद येथे १७ व १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. गेल्या महिन्यामध्ये पक्षाध्यक्ष खरगे यांनी नवी कार्यकारिणी नियुक्त केली असून समितीची ही पहिलीच बैठक आहे. १७ सप्टेंबर रोजी जाहीर सभा घेतली जाणार असून सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, काँग्रेसचे प्रमुख नेतेही हजर असतील.

‘भारत जोडो’ यात्रेची वर्षपूर्ती

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वर्षपूर्तीनिर्मित्त ७ सप्टेंबर रोजी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेसचे सर्व नेते-पदाधिकारी या यात्रेत सामील होणार आहेत. भारत जोडो यात्रेसंदर्भात बैठकाही घेतल्या जातील, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली.