अदानी आणि अंबांनी यांसारख्या उद्योगपतींना सरकारच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाची अगोदरपासूनच माहिती होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपच्याच एका आमदाराने केला आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयावरून टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील काल नोटाबंदीचा निर्णय सामान्य जनतेचा पैसा उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी घेण्यात आल्याचे म्हटले होते. काँग्रेस नेत्यांनीही या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकारला विरोधकांकडून अशाप्रकारच्या आरोप अपेक्षितच होते. मात्र, आता भाजपचे राजस्थानमधील आमदार भवानी सिंग यांच्या विधानामुळे पक्षाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. आमदार भवानी सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून आज संसदेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अदानी, अंबांनी यांच्यासह काही जणांना सरकार ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करणार असल्याचे माहित होते. त्यांना सावध करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या निर्णयाची घोषणा होण्यापूर्वीच योग्य ती व्यवस्था केली होती, असे राजवत यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा