वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेशात राजकीय संकट उद्भवल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने वीज निर्यातदारांसाठी नियम शिथिल केल्याचा सर्वाधिक फायदा ‘अदानी पॉवर’ला झाला आहे. केवळ बांगलादेशला केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणाऱ्या या नियमदुरुस्तीमुळे, तेथील राजकीय अस्थैर्यामुळे ‘अदानी पॉवर’ला देशांतर्गत बाजारपेठेत विजेची विक्री करणे शक्य होणार आहे.
नियम बदलांमुळे बांगलादेशला देयक चुकते करण्यास अडचण आली तर कंपनीला (अदानी पॉवर) होणारा तोटा टाळता येणार आहे. मात्र, सरकारने केलेल्या नियमबदलांमुळे बांगलादेश बरोबरच्या कंत्राटात काही फरक पडत नसल्याचे ‘अदानी पॉवर’चे म्हणणे आहे. नियमांतील दुरुस्त्यांमुळे भारतीय ग्रीडशी जोडणी अधिक सुलभ होते पण ती वीज खरेदी करणे भारतावर बंधनकारक नाही असा दावा कंपनीने केला आहे. आपण बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी अलिकडेच जाहीर केले होते.
हेही वाचा >>>Heart Attack : देशभक्तीचं गाणं म्हणणारी महिला खुर्चीवरुन कोसळली, हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू
नियमातील बदल
वीजखरेदी कराराअंतर्गत देयक चुकते करण्यास खरेदीदार देशाला शक्य झाले नाही तर वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेली वीज देशातच विकता येईल. कारण संकटात सापडलेल्या बांगलादेशला वीजपुरवठा करणारी ‘अदानी पॉवर’ ही भारतातील एकमेव कंपनी आहे. राजकीय अस्थैर्यामुळे बांगलादेश अदानींचे देयक चुकते करू शकणार नसेल तर कंपनीला भारताच वीजविक्री करता येणार आहे.