वॉशिंग्टन : अमेरिका युक्रेनला अतिरिक्त ७२.५ कोटी डॉलरचा शस्त्रपुरवठा करणार असून, इतर लष्करी मदतही करणार आहे. ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीअटी ऑर्गनायझेशन’च्या (नाटो) बैठकीनंतर बायडेन प्रशासनाने ही घोषणा केली. ‘नाटो’च्या बैठकीत युरोपीय देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा व हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक भागांत रशियाने आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढवल्याने युरोपसह जगातील अनेक राष्ट्रांच्या नेत्यांनी युक्रेनला भरीव मदत पुरवण्याचे वचन दिले.

बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की युक्रेनला अमेरिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अतिरिक्त लष्करी मदतीत कोणतेही महत्त्वाचे नवे शस्त्र समाविष्ट नाही. युक्रेनच्या शस्त्रप्रणालीसाठी दारूगोळय़ाचा पुनर्पुरवठा केला जाईल.