Adenovirus cases in West Bengal: २०१९-२० मध्ये करोना महामारीला सुरुवात झाली. जगभरामध्ये पसरलेल्या या रोगाने लाखो लोकांचा बळी घेतला. पहिल्या लाटेनंतर करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट उदयास आला. एकूण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारद्वारे टाळेबंदी करण्यात आली. पुढे प्रकरण स्थिर झाल्यानंतर हळूहळू सर्वकाही सुरु करण्यात आले. करोनाचे संकट असतानाच एका नव्या विषाणूमुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल राज्यामध्ये ॲडिनोव्हायरस विषाणूने पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटरिक डिसीजेस (NICED) या संस्थेद्वारे कोलकाता शहरामधील नागरिकांचे परिक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण परिक्षणामध्ये किमान ३० टक्के नागरिक या विषाणूने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर गंभीरपणे लक्ष देण्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. केंद्राच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागानुसार, ॲडिनोव्हायरस हा विषाणू स्पर्श किंवा हवेमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहचतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत असला तरी, लहान बालकांना त्याचा जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

मध्यम आकार असलेले अविकसित ॲडिनोव्हायरस विषाणूंमुळे फ्लूचे संक्रमण होते. मानवांसाठी धोकादायक असलेल्या ॲडिनोव्हायरस विषाणूचे ५० प्रकार असल्याचेचा दावा संशोधकांनी केला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्यांना आणि श्वसनाचे त्रास असणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग लवकर होऊ शकतो. या विषाणूच्या संसर्गामुळे सर्दी, ताप, श्वसनाचे आजार संभवतात. पश्चिम बंगालमध्ये ॲडिनोव्हायरसमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याने तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲडिनोव्हायरसची लक्षणे:

या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर सर्दी, ताप, घसा कोरडा पडणे, न्यूमोनिया यांचा सामना करावा लागू शकतो. याच्या लक्षणांमध्ये श्वास घेताना त्रास होणे, पोटदुखी, मळमळ यांचा समावेश होतो.

ॲडिनोव्हायरसवरील उपचार:

यावर कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्यामुळे या विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तोंडावर मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, लोकांशी हात न मिळवणे अशा करोना काळातील प्रतिबंधाचा अनुसरण करावे. सर्दी, ताप अशी लक्षणे दिसल्यास सुरुवातीला घरच्या घरी उपचार करावेत. श्वसनाचा त्रास वाढल्यास/ ताप जात नसल्यास/ अशक्तपणा आल्यास डॉक्टरांना दाखवून योग्य ते उपचार करवून घ्यावेत.