युगांडामधील ‘अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’ (एडीएफ) संघटनेच्या बंडखोरांनी एका शाळेवर सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात किमान २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ६ विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. ‘डेमोक्रॅटिक फोर्स’ ही इसिसशी संबंधित संघटना आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस आणि युगांडा सैन्यांना दिली आहे. पुढील कारवाई केली जात आहे.

‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ (डीआरसी) मधील युगांडाचे लष्करी प्रवक्ते मेजर बिलाल कटांबा यांनी ‘सीएनएन’ला सांगितलं की, एडीएफच्या सुमारे २० ते २५ बंडखोरांनी शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास एमपोंडवे येथील ल्हुबिरिरा माध्यमिक विद्यालयावर हल्ला केला. शुक्रवारी मध्यरात्री शाळेला आग लावण्यापूर्वी २६ विद्यार्थी ठार आणि आठ विद्यार्थी जखमी झाले. ही शाळा युगांडा-काँगोच्या सीमेवर वसलेली आहे.

Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
bhandara Mobile phone explodes in pocket Principal died
धक्कादायक! दुचाकीरून जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट; मुख्यध्यापकाचा मृत्यू
96 Students Hospitalised After Eating Mid-Day Meal
96 Students Hospitalised After Eating Mid-Day Meal : शाळेत खिचडी खाल्ली अन्… चंद्रपूर जिल्ह्यात ९६ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

स्थानिक प्रशासनाकडून शनिवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या दुर्दैवी घटनेतून कुणीही जिवंत वाचलं नसल्याचं सांगितलं जात आहे. सैनिकांकडून हल्लेखोरांचा पाठलाग केला जात आहे. संबंधित हल्लेखोर विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने जात आहेत, असंही बिलाल म्हणाले.

नेमकं काय घडलं?

स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, इसिसशी संबंधित असलेल्या एडीएफच्या सशस्त्र बंडखोरांनी शुक्रवारी रात्री एमपोंडवे येथील शाळेवर हल्ला केला. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थांचं दुकानही लुटलं. तसेच शाळेला आग लावली. या आगीत जवळपास २६ विद्यार्थी ठार झाले आहेत. तर सहा विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. जखमी विद्यार्थ्यांना बवेरा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे. संबंधित आठही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

Story img Loader