पुणे : नातेसंबंधात असलेल्या पौगंडावस्थेतील मुलींपैकी सुमारे २४ टक्के म्हणजेच १ कोटी ९० लाख जणी शारीरिक अथवा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. विशेष म्हणजे, या मुली २० वर्षांच्या होईपर्यंत त्यांच्या जोडीदाराकडूनच अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. पौगंडावस्थेतील दर सहापैकी एका मुलीवर गेल्या वर्षी अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा पौगंडावस्थेतील १५ ते १९ वयोगटातील मुलींबाबतचा हा अहवाल लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. पास्कल अलॉटी म्हणाले की, जोडीदारांकडून पौगंडावस्थेतील मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. अशा मुलींची संख्या काही कोटींच्या घरात आहे. आयुष्याच्या जडणघडणीच्या टप्प्यावरील महत्त्वाच्या वर्षांमध्ये अशा प्रकारच्या अत्याचारामुळे या मुलींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहायला हवे. या अत्याचाराला प्रतिबंध आणि मुलींना मदत या गोष्टींवर भर द्यायला हवा.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?

भूस्खलनातील मृतांचा आकडा १६७; १९१ बेपत्ता, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

जोडीदाराकडून होणाऱ्या अत्याचारामुळे तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक भवितव्यावर याचा परिणाम होत आहे. त्यातून त्यांचे भविष्यातील नातेसंबंध बिघडून जात आहे. अत्याचारामुळे मुलींना दुखापत, नैराश्य, मनोविकार, अनियोजित गर्भधारणा, गुप्तरोग यासह इतर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ओशनियामध्ये सर्वाधिक प्रमाण

पौगंडावस्थेतील मुलींवर अत्याचाराच्या घटना जगभरात सगळीकडे दिसून येत आहेत. यात ओशनिया खंडामध्ये हे प्रमाण तब्बल ४७ टक्के आणि मध्य आफ्रिकेत हे प्रमाण ४० टक्के आहे. युरोपमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी १० टक्के असून, मध्य आशियात ११ टक्के आहे. काही देशांमध्ये पौगंडावस्थेतील मुलींपैकी ४९ टक्के मुली अत्याचाराच्या शिकार बनत आहेत तर काही देशांमध्ये हे प्रमाण ६ टक्क्यांपर्यंत कमी आहे.

आयुष्याच्या जडणघडणीच्या टप्प्यावरील महत्त्वाच्या वर्षांमध्ये अशा अत्याचारांमुळे मुलींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहाणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>>Shatrughan Sinha : “पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींच्या…”, अनुराग ठाकूरांच्या ‘त्या’ विधानावरून शत्रुघ्न सिन्हा यांची टीका!

पाचपैकी एका मुलीचा बालविवाह

जगभरात बालविवाहाची समस्या मोठी आहे. जगातील दर पाचपैकी एका मुलीचा बालविवाह होतो. बालविवाहामुळे या मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही. याचबरोबर जोडीदाराच्या अत्याचाराला बळी पडण्याचे त्यांचे प्रमाणही अधिक आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत एकाही देशाने २०३० पर्यंत महिलांविरोधातील अत्याचार संपविण्याच्या दिशेने पावले टाकलेली नाहीत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.