देशातलं राजकीय वातावरण आता तापू लागलं आहे. अवघ्या वर्षभरात देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपाप्रणीत एनडीएला पराभूत करण्यासाठी रणशिंग फुंकलं आहे. त्यांच्या जागावाटपाच्या बैठका चालू असताना दुसरीकडे भाजपाकडून या आघाडीची हेटाळणी केली जात आहे. तसेच, पुढील लोकसभा निवडणुकीत विजयाचे वेगवेगळे दावे केले जात आहेत. या सगळ्या राजकीय चर्चेक २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जमाखर्चाचा हिशेब समोर आला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ADR अर्थात Association for Democratic Reforms या संस्थेच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे देशातील राजकीय पक्षांबाबत आर्थिक जमाखर्चाच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला असून त्याचा अहवाल नुकताच एडीआरनं प्रकाशित केला आहे. या अहवालातून देशातील ८ प्रमुख पक्षांच्या आर्थिक स्थितीविषयी महत्त्वाचची माहिती समोर आली आहे. या ८ पक्षांमध्ये भाजपा व काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, भाकप, माकप, तृणमूल काँग्रेस व एनपीईपी या राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. सीएनबीसी १८ नं या अहवालाचं सविस्तर वृत्त संकेतस्थळावर दिलं आहे.

देशातील प्रमुख ८ राष्ट्रीय पक्षांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात निवडणूक यंत्रणेकडे आपल्या आर्थिक संपत्तीविषयीची माहिती जमा केली आहे. या माहितीच्या आधारे एडीआरनं तयार केलेल्या अहवालानुसार या आठ पक्षांनी मिळून एकूण ८ हजार ८२९ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात हा आकडा ७,२९७.६२ कोटी इतका होता.

भाजपाच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

या अहवालानुसार, भाजपाची संपत्ती २०२१-२२मध्ये ६,०४६.८१ कोटी इतकी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधीच्या वर्षी हाच आकडा ४,९९० कोटी इतका होता. त्यामुळे २०२१-२२ या वर्षी भाजपाच्या संपत्तीमध्ये २१.१७ टक्क्यांची वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाची एकूण संपत्ती ८०५.६८ कोटी

भाजपाप्रमाणेच काँग्रेसच्या संपत्तीतही १६.५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पक्षाची एकूण संपत्ती ६९१.११ कोटींवरून ८०५.६८ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

बसपाची संपत्ती वाढली नाही, घटली!

दरम्यान, भाजपा व काँग्रेसची संपत्ती वाढली असताना बसपा हा या ८ पक्षांमधला एकमेव पक्ष आहे ज्याची संपत्ती याच काळात वाढली नसून घटली आहे. ही घट ५.७४ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. यानुसार त्यांची संपत्ती ६९०.७१ कोटींवरून ७३२.७९ कोटी झाल्याचं वृत्तात नमूद केलं आहे.

तृणमूल काँग्रेसचं काय?

२०२०-२१मध्ये तृणमूल काँग्रेसची एकूण संपत्ती १८२.००१ कोटी इतकी होती. पुढच्याच वर्षी त्यात १५१.७० टक्क्यांची वाढ झाली! अर्थात हा आकडा ४५८.१० कोटींपर्यंत पोहोचला.