व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. १५८ वर्षांपूर्वीचे कलम ४९७ रद्द करण्यात आलं आहे. यातली महत्त्वाची बाब अशी की हा निर्णय ज्या पाचणांच्या खंडपीठाने दिला त्यात जस्टिस धनंजय वाय चंद्रचूड यांचाही समावेश होता. त्यांचे वडिल जस्टिस वाय व्ही. चंद्रचूड यांनी १९८५ मध्ये हे कलम संवैधानिक ठरवले होते. जस्टीस वाय व्ही चंद्रचूड हे दीर्घकाळ आपल्या देशाचे चीफ जस्टिस होते. आज त्यांच्या मुलाने म्हणजेच धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचाच निर्णय बदलत कलम ४९७ रद्द केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा