गुन्ह्यामध्ये न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींनाही निवडणूक लढविण्याचा अधिकार देणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शरसंधान केल्यावर तो मागे घेण्यात आला होता़  भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी हा अध्यादेश मागे घेण्याचे श्रेय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना असल्याचे वक्तव्य केले होत़े  परंतु, अडवाणी यांचे हे वक्तव्य म्हणजे केवळ तर्क असून आपला या घडामोडींशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रपतींनी दिले आह़े  ‘हा अध्यादेश मागे घेण्यासंदर्भात ज्यांनी माझी भेट मागितली़  त्यांना मी भेटलो़  भाजपचे नेते मला भेटले, तसेच आम आदमी पक्षाचे आणि इतरही शिष्टमंडळे मला भेटली़  त्यामुळे विरोधी पक्षाच्या याबाबतच्या मतावर मी भाष्य करू इच्छित नाही,’ असेही ते म्हणाल़े  सध्या बेल्जियम आणि तुर्कस्थानच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी विमान प्रवासादरम्यान पत्रकारांना ही माहिती दिली़ ‘मी याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली आणि चर्चेचे फलित काय, ते सर्वाना माहीत आह़े  कॅबिनेटनेच हा अध्यादेश आणण्याचा निर्णय घेतला होता आणि २ ऑक्टोबरच्या बैठकीत तो मागे घेण्याचा निर्णयही कॅबिनेटने स्वत:च घेतला़  हे अथक सत्य आह़े  आता त्यासाठी कोण जबाबदार आह़े  इतपत जबाबदार आहे आदी गोष्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मत आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा