फायनान्शियल एक्सप्रेस डॉट कॉम अॅडव्हेंचर टुरिझम मीट (ATM) २०२४ शिलाँग येथील स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ४ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते आणि यात भारतातील साहसी पर्यटनाच्या अफाट शक्यतांचा आढावा घेण्यात आला. ‘ATM 2024’ चे प्रेझेंटिंग पार्टनर ‘अतुल्य भारत’सह मेघालय टुरिझम होते. ओडिशा टुरिझम, उत्तराखंड टुरिझम, बोडोलँड टुरिझम आणि उत्तर प्रदेश टुरिझम हे गोल्ड पार्टनर होते.

उद्घाटन सत्र

कार्यक्रमाची सुरुवात “स्थानिक अर्थव्यवस्थांना साहसी पर्यटनाद्वारे पुनरुज्जीवित करणे या थीमवरील सत्राने झाली. अरुणाचल प्रदेशचे आमदार आणि राष्ट्रीय पर्यटन सल्लागार परिषद (NTAC), भारत सरकार व पर्यटन मंत्रालयाचे सदस्य ओकेन तायेंग, ओव्हरलँडर इंडियाचे संचालक अजित राणा, नॉर्थ ईस्ट इंडिया टुरिझम कॉन्फडरेशन (NEITC) चे अध्यक्ष ई. बानलमलांग ब्लाह आणि टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ मेघालय (TOAM) यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी साहसी पर्यटनाच्या क्षमतांवर चर्चा केली. असोसिएशन फॉर कन्झर्वेशन अँड टुरिझमचे कन्व्हेनर राज बासु यांनी या पॅनेलमधील चर्चेचे सूत्रसंचालन केले. पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती, स्थानिक व्यवसायांना समर्थन आणि पर्यावरणाचे संरक्षण यावर चर्चेमध्ये भर दिला. साहसी पर्यटन कसे अद्वितीय आणि अस्सल अनुभवांची इच्छा असलेल्या पर्यटकांना आकर्षित करते आणि त्याच वेळी स्थानिक समुदायांचे आर्थिक उत्थान कसे करू शकते यावर चर्चेदरम्यान विशेष भर देण्यात आला.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
The winter session of Legislature starts December 16 in Nagpur as per Agreement
नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
Nagpur winter session will be held from December 16th to 21st and it will be formality
नागपूर हिवाळी अधिवेशन पाचच दिवसांचे ? वैदर्भीय नाराज
jaipur literature festival will be held from january 30 to february 3 zws
बुकबातमी : जयपूर लिटफेस्टमध्ये यंदा मराठीसुद्धा…
tuberculosis in Mumbai, eradicate tuberculosis,
क्षयरोग निर्मूलनसाठी मुंबईमध्ये राबविणार ‘१०० दिवस मोहीम’, २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबरपासून मोहीम सुरू होणार
ATM-Inside-Image-5
. बानलमलांग ब्लाह, राज बसू, ओकेन तायंग आणि अजित राणा

उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी मुख्य अतिथी ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवाती परिडा आणि मेघालयचे पर्यटनमंत्री बाह पॉल लिंयांगदोह यांच्या हस्ते पारंपारिक दिवा प्रज्वलित करून झाले. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंधवानी यांच्या स्वागतपर भाषणाने समारंभाला सुरुवात झाली. मेघालय सरकारचे पर्यटन संचालक आणि मेघालय पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सायरिल व्ही. दारलोंग दियांगदोह यांनी स्वागतपर भाषण केले आणि सादरीकरण केले. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी विशेष व्हिडिओ संदेशामध्ये राज्याच्या विकासात साहसी पर्यटनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. बोडोलँड प्रादेशिक परिषद, आसामच्या पर्यटन विभागाचे कार्यकारी सदस्य डॉ. धर्म नारायण दास यांनी बोडोलँडच्या पर्यटन उपक्रमांवर विशेष भाषण दिले.

इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंधवानी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले, “गेल्यावर्षी येथे आपण जेव्हा एकत्र जमलो होतो, तेव्हा थीम होती ‘शाश्वतता’. यावर्षी, थीम आहे साहस. येथे या क्षेत्रातील अनेक दिग्गज आहेत आणि ही एक उत्तम सरुवात आहे.”

ATM-Inside-Image-3
सिरिल व्ही. दारलोंग दियांगदोह, पर्यटन संचालक, मेघालय सरकार आणि व्यवस्थापकीय संचालक, मेघालय पर्यटन विकास महामंडळ

मेघालय सरकारचे पर्यटन संचालक आणि मेघालय पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सायरिल व्ही. दारलाँग दियांगदोह यांनी आपल्या स्वागतपर भाषणात उपस्थितांचं स्वागत केलं. त्यात अनेक पर्यटन विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांना दियांगदोह यांनी ‘भविष्यातील उद्योजक’ म्हटले. “अॅडव्हेंचर टुरिझम मीटचे उद्दिष्ट या संपूर्ण प्रदेशाला पुढे नेण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण आणि सहकार्य करणे आहे,” असे त्यांनी सांगितले.

ATM-Inside-Image-2
सन्माननीय पाहुणे बाह पॉल लिंगदोह, पर्यटन मंत्री, मेघालय सरकार

मेघालयचे पर्यटन मंत्री बाह पॉल लियांगदोह यांनी आपल्या भाषणात एक प्रादेशिक दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे सांगितले. “आपल्या परस्पर अवलंबित्वामुळे आपण स्वतंत्र होऊ शकतो आणि एकत्रितपणे प्रगती करू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

ATM-Inside-Image-1
प्रवती पारिदा, उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री, ओडिशा सरकार

मुख्य अतिथी ओडिशा सरकारच्या उपमुख्यमंत्री व पर्यटनमंत्री प्रवाती परिडा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भगवान जगन्नाथ यांना वंदन करून केली. त्यांनी मेघालयच्या मातृसत्ताक परंपरेची स्तुती केली. “ओडिशा सरकार खूप काळानंतर राज्यात साहसी पर्यटनाला चालना देत आहे. साहसी पर्यटन शिलाँग येथील या मीटमधून मिळालेल्या शिकवणीनुसार आम्ही ओडिशामध्ये साहसी पर्यटन विकसित करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

ATM-Inside-Image-4
डॉ. धर्म नारायण दास, कार्यकारी सदस्य, पर्यटन विभाग, बोडोलँड प्रादेशिक परिषद, आसाम

आपल्या विशेष भाषणात, आसाम पर्यटन विभागाच्या बोडोलँड प्रादेशिक परिषदेटे कार्यकारी सदस्य डॉ. धर्म नारायण दास यांनी बोडोलँडच्या पर्यटन आकर्षणांवर विशेष लक्ष केंद्रित केले. विशेषतः युनेस्को जागतिक वारसा स्थळ आणि जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या मानस राष्ट्रीय उद्यानावर त्यांनी भर दिला. “जग बदलत आहे आणि प्रवासी आता त्यांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल अधिक जागरूक होत आहेत. बोडोलँड आपलं नैसर्गिक सौंदर्य व अपरिचित क्षमतेसह प्रवाशांना एक अप्रतिम साहसी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे,” असे त्यांनी सांगितले.

सत्रे आणि चर्चासत्रे

संपूर्ण दिवसभर चाललेल्या ATM 2024 मध्ये आघाडीच्या साहसी पर्यटन तज्ञांकडून अनेक चर्चासत्रे आणि सादरीकरणे झाली. ‘मेघालयातील अमर्यादित साहसी पर्यटन क्षमता’ या सत्रात साहसी पर्यटनातील आघाडीच्या व्यक्तींनी, ज्यात केव्हिंग अॅडव्हेंचर एक्स्पर्ट ब्रायन खारप्रन डॅली, पायोनियर अॅडव्हेंचर टूर्सचे सह-संस्थापक जेसन जर्मन लामारे, चेन रिअॅक्शन इंडियाचे संचालक शाहवार हुसेन आणि शिलाँग मोटरस्पोर्ट्सचे यूजीन नियांगती यांचा समावेश होता. मेघालयातील साहसी पर्यटनाच्या संधींबाबत या सर्वांनी त्यांचे विचार मांडले. हे सत्र इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे डेप्युटी असोसिएट एडिटर अॅरन परेरा यांनी सूत्रसंचालित केले. प्रत्येक पॅनेल सदस्याने साहसी पर्यटनाच्या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली. मेघालयला प्रमुख साहसी पर्यटन स्थळ म्हणून कसे ब्रँडिंग करता येईल यावर या सत्रात भर देण्यात आला.

ATM-Inside-Image-7
अॅरन परेरा यांच्यासोबत ब्रायन खारप्रान डॅली, यूजीन नियांगटी, शाहवार हुसेन आणि जेसन जर्मन लामारे

ATM 2024 मधील मुख्य सादरीकरणांमध्ये ब्रायन खारप्रन डॅली यांच्या मेघालयातील प्रसिद्ध केव्हिंग अॅडव्हेंचर्सवरील चर्चा आणि इबेक्स एक्सपेडिशन्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मनदीप सिंग सोइन यांच्या “एक्सप्लोररच्या कथा” या सादरीकरणाचा समावेश होता. तसेच कर्नल आनंद स्वरूप यांनी “भारताच्या ध्रुवीय प्रवासाशी असलेले नाते” या विषयी केलेले प्रेरणादायी भाषण उपस्थितांच्या पसंतीस उतरले, ज्यात त्यांच्या ध्रुवीय शोधांचा अनुभव त्यांनी सांगितला.

ATM-Inside-Image-8
कर्नल आनंद स्वरूप (निवृत्त)

“साहसी पर्यटनातील महिला” या आगळ्यावेगळ्या सत्रात गुहाशोधक शॅली दियांगदोह आणि पर्वतारोहक दोलाईन खरभी यांच्याशी संवाद झाला. हे सत्र इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाचे डेप्युटी असोसिएट एडिटर अॅरन परेरा यांनी सूत्रसंचालित केले.

ATM-Inside-Image-9
शॅली दिएंगदोह, दोलाईन खरभी आणि मुकेश सिंग

“साहसी पर्यटनाचा भविष्यकाळ” या अंतिम सत्रात साहसी पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींनी भारताच्या साहसी पर्यटन क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा केली. या पॅनेलमध्ये असोसिएशन फॉर कन्झर्वेशन अँड टुरिझमचे संयोजक राज बसू, ओव्हरलँडर इंडियाचे संचालक अजित राणा, FICCI ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी आणि डिजिटल कमिटीचे सह-अध्यक्ष आशिष कुमार आणि ऑर्गॅनिक हाइडअवेज प्रा. लि. चे सीईओ आणि सह-संस्थापक संजय शर्मा यांचा समावेश होता. या सत्राचे सूत्रसंचालन अरुणाचल प्रदेशचे आमदार ओकेन तायंग यांनी केले. या सत्रात साहसी पर्यटनाला आकार देणारे नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यात आली. तसेच या उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणा यावरही विचार विनिमय झाला.

ATM-Inside-Image-10
राज बसू, अजित राणा आणि संजय शर्मा

ATM 2024 चे एक वैशिष्ट्य म्हणजे यात साहसी पर्यटन ऑपरेटर आणि भागधारकांसाठी आयोजित कौशल्य कार्यशाळा होती. या कार्यशाळेचे नेतृत्व मनदीप सिंग सोइन यांनी केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या व्यक्तींना स्थानिक समुदाय आणि नैसर्गिक परिसंस्थांचा आदर करून शाश्वत साहसी अनुभव घेण्याच्या सर्वोत्तम पद्धतींची ओळख करून देण्यात आली. सोइन यांनी साहसी पर्यटनातील सुरक्षा, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे महत्त्व अधोरेखित केले. जागतिक मानकांशी जुळवून घेण्याच्या गरजेवर जोर दिला, जेणेकरून ऑपरेटरच्या विश्वासार्हतेत सुधारणा होईल आणि अधिक व्यापक प्रमाणावर ग्राहकांना आकर्षित करता येईल. या कार्यशाळेच्या शेवटी, सहभागी व्यक्तींनी त्यांच्या प्रदेशात, विशेषतः ईशान्य भारतात या पद्धती कशा लागू करता येतील यावर चर्चा केली.

ATM-Inside-Image-6
मनदीप सिंग

यानंतर स्थानिक कलाकार मंडळींच्या ना यू ब्नाई या गटानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं.

ATM 2024 चा समारोप इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महसूल प्रमुख मुकेश सिंग यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व सहभागी सदस्य व मान्यवरांचे आभार मानले आणि भारताला साहसी पर्यटनाचे आघाडीचे ठिकाण बनवण्यासाठी सातत्याने सहकार्य आणि नवकल्पनांची गरज अधोरेखित केली.

Thinc our cities

The Financial Express.com Adventure Tourism Meet 2024 ने साहसी पर्यटनाला भारतभर प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर सहकार्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकले आहे.

Story img Loader