पीटीआय, लखनौ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुरुषांनी शिंप्यांच्या दुकानात महिलांचे मोजमाप घेऊ नये, त्यांनी स्त्रीचे केस कापू नयेत किंवा तिला व्यायामशाळेत प्रशिक्षण देऊ नये, असे प्रस्ताव उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने विचारार्थ मांडले आहेत. महिलांचे संरक्षण करणे आणि ‘सहेतुक स्पर्श’ व पुरुषांचा वाईट हेतू रोखण्यासाठी आयोगाने यासंदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत. यासंदर्भात गेल्या महिन्यात २८ ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर जिम, कापड दुकाने व कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविणे व शाळेच्या बसेसमध्ये सुरक्षेसाठी महिलेची नियुक्ती करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला. आयोगाने मार्गदर्शक सूचनांसंदर्भात सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्रे पाठविली आहेत.
शिंपी पुरुष असेल तर आक्षेप नाही परंतु माप महिलेनेच घ्यायला हवे. महिलांची जिम व योग केंद्रात प्रशिक्षकपदी महिलाच असावी. अशा संस्थांमध्ये सीसीटीव्ही व डीव्हीआर सुरूच ठेवावे. महिलांचे कपडे विकणाऱ्या दुकानात महिलाच असावी.- बबिता चौहान, अध्यक्षा, उत्तर प्रदेश महिला आयोग
हेही वाचा >>>तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
प्रस्ताव
● कापडाच्या दुकानात महिला कर्मचारी असाव्या.
● जिम, योग केंद्रात महिला प्रशिक्षक.
● शाळा बसेसमध्ये महिलेची नियुक्ती
● समाजवादी पक्षाच्या आमदार रागिणी सोनकर म्हणाल्या की कोणत्या शिंप्याकडे कपडे शिवायचे किंवा कोणत्या जिममध्ये जायचे याचा निर्णय व्यक्तींवर सोपवावा.
● यापेक्षा मूर्ख कल्पना असू शकत नाही अशी टीका लखनऊ विद्यापीठाच्या माजी हंगामी कुलगुरू रूपरेखा वर्मा यांनी केलीे. मुले आणि मुली यांच्यामध्ये अशा प्रकारचा भेद करण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या.
● ही विचार प्रक्रिया योग्य नाही असे मत ‘ऑल इंडिया डेमोक्रॅटिक विमेन्स असोसिएशन’च्या राष्ट्रीय सहसचिव मधू गर्ग यांनी व्यक्त केले.