भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे आखाती देशांसह इतर अनेक देशांनी भारत देशावर टीका केली. त्यानंतर देशातही वेगवेगवळ्या भागात निदर्शने तसेच काही ठिकाणी हिंसक आंदोलने घडली असून नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. असे असताना आता दोन वकिलांनी नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.

हेही वाचा >>> National Hearld: ‘यंग इंडियन’कडून किती पैसे घेतले? ईडीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले…

अॅड. अबू सोहेल आणि अॅड. चांद कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली असून नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची निष्पक्ष, विश्वासार्ह आणि निप:क्षपाती चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशात अशांतता तसेच खळबळ उडाली असल्याचे या याचिकेत म्हणण्यात आले आहे. तसेच नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क तसेच १४, १५, २१, २६, २९ या कलामांचे उल्लंघन झाल्याचाही दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> President Election: बैठक सुरु होताच ममता बॅनर्जींकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर; शरद पवार स्पष्टच म्हणाले “मला अजून…”

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी २७ मे २०२२ रोजी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर बोलताना इस्लामचा अवमान केला आहे. तसेच प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे देशात जातीय द्वेषाचे बीज पेरले गेले. ज्यामुळे संपूर्ण देशात असंतोष निर्माण झाला असून शांतता बिघडत आहे, असे या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >>> युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? मोदी सरकार त्यांच्यासाठी काय करतंय? सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपाला घरचा आहेर

दरम्यान, नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन मागील काही दिवसांपासून देशात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांत या निदर्शनांना हिंसक वळण मिळाले आहे. असे असताना आता या याचिकेवर सुप्रिम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader