Advocate in Court Wearing Jeans : वकिलांनी योग्य पोशाखातच न्यायालयात आलं पाहिजे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जीन्स (Advocate in Court Wearing Jeans )घालून आलेल्या वकिलाला खडे बोल सुनावले आहेत. एका वकिलाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. गुवाहाटी न्यायालयाने जीन्स घालून आलेल्या वकिलाला निलंबित केलं होतं. त्या निर्णयाविरोधात या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेही वकिलाला सुनावलं आहे.
नेमकं हे प्रकरण काय? (What is the Case?)
गुवाहाटी न्यायालयाने पोलिसांना सांगून जीन्स घालून आलेल्या वकिलाला बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाने असा निर्णय कसा घेतला? मला पोलिसांकरवी बाहेर का काढलं? असे सवाल करत याचिका दाखल केली होती. वकिलाचं म्हणणं हे होतं की मी जीन्स घालून आल्याबद्दल माफी मागितली होती. तसंच न्यायालयाने मला जायला सांगितलं असतं तरीही मी गेलो असतो. पोलिसांकरवी मला बाहेर का काढण्यात आलं? मात्र न्यायालयाने वकिलांनी योग्य पोशाखांमध्ये आलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच या याचिकेतील पोलिसांना बोलवून वकिलाला बाहेर काढलं तो उल्लेख काढला आहे.
बी.के. महाजन हे कोर्टात जीन्स घालून आले होते (Advocate Wear Jeans in Court )
गुवाहाटीच्या एक प्रकरणाची सुनावणी स्थगित केली होती. कारण एक वरिष्ठ वकील न्यायालयात जीन्स घालून आले होते. हायकोर्टात याचिकाकर्ते वकील बी. के. महाजन जीन्स घालून आले होते. याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना बोलवलं आणि या वकिलांना पोलिसांकरवी बाहेर काढलं. यानंतर या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. लाईव्ह लॉ ने हे वृत्त दिलं आहे.
अलाहाबाद कोर्टातही समोर आलं होतं असं प्रकरण
काही दिवसांपूर्वी अलाहाबाद कोर्टात असं प्रकरण समोर आलं होतं. वाराणसीच्या सिंचन विभागाच्या इंजिनिअर विजय कुमार कुशवाहा हायकोर्टात जीन्स घालून गेले होते. त्यावेळी त्यांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.न्यायालयाने आदेशात असं म्हटलं आहे बी. के. महाजन यांनी केलेलं कृत्य योग्य नाही. महाजन हे सातत्याने जीन्स घालून कोर्टात येत होते असंही निदर्शनास आलं आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण लक्षात आलं त्यानंतर पोलीस बोलवून त्यांना बाहेर नेण्यात आलं. तसंच त्यांना नोटीसही बजावण्यात आली.
© IE Online Media Services (P) Ltd