आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपकडून पुढे केले जात असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची तोंडभरून तारीफ केली आहे. अडवाणी आणि मोदी यांचे ‘एकूण साहचर्य’ बघता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तर सुषमा स्वराज यांनाही उतरविण्याचा अडवाणी यांचा हेतू तर नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपच्या नेतेमंडळींत जे नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत, त्यामध्ये सुषमा स्वराज याही सुप्तपणे आहेत. विशेष म्हणजे अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांच्या वक्तृत्वाची तुलना ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याच वक्तृत्वाशी केली.
भाजपच्या तीन दिवसांच्या बैठकीत बोलताना वाजपेयी यांच्यासारखे वक्तृत्व कौशल्य आपल्याकडे नसल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच सुषमा स्वराज यांच्याकडे मात्र तसे गुण असल्याचा उल्लेख अडवाणी यांनी आवर्जून केला.
आपल्या मनात तसा गंड आहे आणि आपण सुषमाजींना तसे सांगितलेही आहे, असे अडवाणी यांनी कबूल केले.
अडवाणी यांच्याकडून सुषमा स्वराज यांचे कौतुक
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपकडून पुढे केले जात असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची तोंडभरून तारीफ केली आहे.
First published on: 04-03-2013 at 02:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adwani appreciated sushma swaraj