वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी समूहाची अब्जावधी डॉलरची गुंतवणूक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कोळसा खाणींशी संलग्न तीन कंपन्या – कारमायकल रेल ॲण्ड पोर्ट सिंगापूर, कारमायकल रेल सिंगापूर आणि ॲबट पॉइंट टर्मिनल एक्स्पान्शनच्या संचालक पदावरून गौतम अदानी यांचे थोरले बंधू विनोद अदानी पायउतार झाल्याचे वृत्त आहे.

जानेवारीअखेरीस प्रसिद्ध झालेला हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आणि त्यातील आरोपांमुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांत झालेल्या तीव्र पडझडीच्या पार्श्वभूमीवर, विनोद अदानी हे नाव आणि त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यांनी विदेशातील या कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा नेमका केव्हा दिला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहासंबंधाने चौकशीसाठी समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्याच्या काही दिवस आधीच विनोद अदानी पदमुक्त झाले असण्याची शक्यता आहे.

विनोद अदानी यांनी राजीनामा दिलेल्या या कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातील अदानी कारमायकल खाण प्रकल्पाला आर्थिक प्रवाहाचा स्रोत मॉरिशस, केमन बेटांवरील बनावट कंपन्यांच्या जटिल आणि वादग्रस्त व्यवहारांद्वारे खुला करून तारले असल्याचा आरोप आहे. दुसरीकडे अदानी समूह आणि विनोद अदानी यांच्या कंपन्यांदरम्यान झालेल्या व्यवहारांच्या वेळीच आणि रीतीनुसार प्रगटीकरण केले गेले काय, याची दरम्यान बाजार नियंत्रक ‘सेबी’नेदेखील चौकशी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Affiliated to australia coal mines in which adani group invests amy