अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं घनी यांनी म्हटलं आहे. तसेच हे आरोप राजकीय हेतूने आणि छवी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप घनी यांनी केल्याचं अल झजीराने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोमवारी काबूलमधील रशियन दुतावासाने घनी हे मोठ्याप्रमाणात रोख रक्कम आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला होता. कार आणि हेलिकॉप्टरमधून घनी पैसे घेऊन देशातून पसार झाल्याचा दावा करण्यात आलेला.
नक्की वाचा >> “भूतकाळात केलेली ती चूक मी पुन्हा घडू देणार नाही, अफगाणिस्तान लष्करच…”; बायडेन यांचा निर्धार
“एकीकडे देशातील सरकार कोसळत असताना दुसरीकडे घनी हे देशामधून पळून गेले. त्यांनी चार गाड्या भरुन रोख रक्कम नेली. हे सर्व पैसे हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो सर्व पैसा हेलिकॉप्टरमध्ये मावला नाही. त्यामुळे काही पैसा धावपट्टीवरच सोडून देण्यात आला,” असा दावा रशियाचे अफगाणिस्तानमधील प्रवक्ते निकिता इंश्चेन्को यांनी केल्याचं स्पुटनिकच्या वृत्तात म्हटलं होतं. मात्र घनी यांनी हा दावा फेटाळून लावलाय. “एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला,” असं घनी यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”
घनी नक्की कुठे आहेत?
राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असं यूएईने म्हटलं आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेलेल्यांमध्ये आहेत.
नक्की पाहा >> लोकल ट्रेनप्रमाणे एकाच वेळी अनेकांचा विमानात चढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
स्थानिकांचा विरोध आणि गोळीबार…
तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवलेला असतानाच देशाच्या पूर्व भागात नागरिकांनी बुधवारी दर्शवलेला विरोध या दहशतवादी संघटनेने हिंसकरीत्या मोडून काढला. यात एकजण ठार, तर सहा जण जखमी झाले. अफगाणिस्तानातील ब्रिटिश राजवट १९१९ साली ज्या दिवशी संपुष्टात आली, तो देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक दिवस आधी अनेक नागरिक पूर्व भागातील जलालाबादमध्ये गोळा झाले होते. तालिबानने या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे उभारलेला झेंडा या लोकांनी खाली उतरवला.
नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून
गोळा झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानी हवेत गोळीबार करत असल्याचा आणि लोकांवर हल्ले चढवत असल्याचे नंतर व्हिडीओ चित्रीकरणात दिसून आले. या असंतोषाचे चित्रीकरण करू पाहणाऱ्या एका पत्रकारासह टीव्ही कॅमेरामनला दहशतवाद्यांनी मारहाण केली. या हिंसाचारात किमान १ जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या एका स्थानिक अधिकाऱ्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.