अफगाणिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना झाली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे विमान अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना वाट हरवलं होतं. त्याचदरम्यान एका उंच डोंगराला धडकून विमान कोसळलं. रविवारी (२१ जानेवारी) पहाटे बदख्शां प्रांतातील जेबक जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे विमान कोसळलं. हे भारताचं प्रवासी विमान होतं अशी शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती. दरम्यान, भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, अफगाणिस्तानमध्ये नुकतीच एक दुर्दैवी विमान दुर्घटना झाली आहे. ते दुर्घटनाग्रस्त विमान भारताचं नव्हतं. तसेच कुठलंही नॉन शेड्यूल्ड (एनएसओपी) किंवा चार्टर्ड विमान अफगाणिस्तानमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं नाही. हे एक मोरोक्कन नोंदणीकृत छोटं विमान होतं. आम्हीदेखील यासंबंधीच्या अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहोत. दरम्यान, भारताचं अधिकृत निवेदन येईपर्यंत अफगाणिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की हे भारतीय विमान होतं.

बदख्शां प्रांताच्या सूचना आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख जबीहुल्लाह अमीरी यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितलं, बदख्शां प्रांतातील कुरान-मुंजन आणि जेबक जिल्ह्यामधील डोंगराळ प्रदेशात एक प्रवासी विमान कोसळलं आहे. घटनेचा तपास करण्यासाठी अफगाणिस्तानी सरकारने एक पथक पाठवलं आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ही विमान दुर्घटना झाली आहे.

दरम्यान, या विमानात एकूण किती प्रवासी होते? दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले प्रवासी कोणत्या देशांमधील होते? किंवा अपघातात कोणी बचावलं आहे का? अशा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अफगाणिस्तानी माध्यमांनीदेखील याबाबतचं वृत्त अद्याप प्रसिद्ध केलेलं नाही.

हे ही वाचा >> भारताने दिलेली एअर ॲम्ब्युलन्स वापरण्यास मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा नकार, उपचारांअभावी ब्रेन स्ट्रोक झालेल्या मुलाचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या हवाल्याने अनेक वृत्तसंस्थांनी सुरुवातीला म्हटलं होतं की हे विमान भारताचं होतं. परंतु, केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, दुर्घटनाग्रस्त विमान भारताचं नव्हे तर मोरोक्कोचं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan claims indian passenger plane crash in badakhshan dgca official says not an indian aircraft asc