अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे. गर्दीला पांगवण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी हवेत गोळीबार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चेंगराचेंगरी की गोळीबारात मृत्यू झाला हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

तणावपूर्ण स्थिती पाहता भारतातून अफगाणिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे काबुल आणि दिल्ली दरम्यानची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. भारताकडून एअर इंडियाची काही विमानं एअर लिफ्टसाठी तयार ठेवण्यात आली होती.

अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत आले आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला आहे. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना २० वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरलं होतं. यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलं. अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत.

हैतीमध्ये १० वर्षांनी पुन्हा विनाशकारी भूकंप; १,२९७ जणांच्या मृत्यूसह अनेक शहरं उद्ध्वस्त

तालिबानचा उदय कसा झाला?
सोव्हिएत सैन्याच्या माघारीनंतर विविध समूहात विभागलेल्या संघटना आपापसात लढू लागल्या होत्या. या दरम्यान १९९४ मध्ये या समूहातून एक सशस्त्र गट उदयास आला आणि १९९६ पर्यंत त्याने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला. त्यानंतर संपूर्ण देशात इस्लामिक कायदा लागू केला.

 

Story img Loader