तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी कब्जा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील विद्यापिठांमधील प्राध्यकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यीनींना निरोप दिला. यासंदर्भात बोलताना एका तरुणीने प्राध्यापकांनी आपण कदाचित यापुढे कधीच भेटणार नाही असं सांगितल्यावर धक्काच बसल्याचं म्हटलं. कालपासून काबूलमधील शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्व काही बंद करण्यास सुरुवात झालीय.
बिझनेस स्टॅण्डर्डने अशाचप्रकारे शिक्षण अर्धवट सोडून आता तालिबानी राजवटीखाली जगण्याची मानसिक तयारी करत असणाऱ्या आयशा खूरामशी चर्चा केली. आयशाप्रमाणे हजारो तरुणींचं शिक्षण घेऊन चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न या संघर्षामुळे अपुरं राहणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. काबूल विद्यापिठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांवर अतिम वर्षाला असणाऱ्या आयशाच्या शिक्षणाचे शेवटचे दोन महिने शिल्लक होते. “आता आम्हाला कधीच पदवी मिळणार नाही असं वाटतंय,” असं आयशा सांगते. आमच्या येथील शैक्षणिक व्यवस्था या हल्ल्यामुळे पूर्णपणे कोलमडलीय, असंही आयशाने सांगितलं.
नक्की पाहा >> लोकल ट्रेनप्रमाणे एकाच वेळी अनेकांचा विमानात चढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
हजारो लोक विमानतळाकडे धाव घेत असताना अफगाणिस्तानमध्ये अजराकता माजलेली असूनही एकचा उद्योगाला सुगीचे दिवस आलेत. हा उद्योग म्हणजे बुरख्याची दुकानं. येथील माहिला निळ्या, आकाशी रंगाचा बुरखा घालतात. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येणार असल्याने अनेक महिलांनी बुरख्याच्या दुकानांकडे धाव घेतली असून येथील बुरखापद्धतीनुसार महिलांना अगदी डोक्याच्या केसांपासून पायांपर्यंत अंग झाकणे बंधनकारक असते. आता अचानक बुरख्यांची मागणी वाढल्याने त्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढवण्यात आल्यात. “तालिबान राजवटीत कधीच न राहिलेल्या मुली तालिबानी नियमांचं पालन करणार नाही असं सांगताना दिसत आहेत. मात्र या तरुण मुलींसोबत भविष्यात काय होणार आहे मला ठाऊक नाही. त्या मुली फार हुशार आहेत. आता त्यांना घरी बसून आपल्या भविष्यात काय होणार याची चिंता सतावत असणार,” असं आयशा सांगते.
नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून
लोक देश सोडून का पळतायत?
अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केली आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने नागरिकांना संरक्षणाची हमी देऊनही पूर्वानुभवामुळे भयभीत नागरिक आणि परदेशी दूतावासांतील कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर अफगाणी सुरक्षा दलांनी पाश्चिमात्य देशांच्या लष्करांसाठी मोकळा केला आहे, असे एका वैमानिकाने सांगितले.
नक्की वाचा >> “…अन् त्यांनी देश विकला”; देशातून पलायन केलेल्या अफगाणी राष्ट्राध्यक्षांवर संरक्षण मंत्र्यांचे गंभीर आरोप
तालिबानने दिला शब्द पण…
आपले लढवय्ये सैनिक लोकांच्या घरात शिरणार नाहीत किंवा त्यांच्या उद्योगांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, असे सांगून तालिबानने काबूलच्या रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. अफगाण सरकार किंवा परदेशी सुरक्षा दलांबरोबर काम करणाऱ्यांना आपण ‘माफी’ देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कुणाचाही जीव, मालमत्ता किंवा प्रतिष्ठा यांना धक्का लावण्यात येणार नाही आणि काबूलच्या नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचणार नाही,’ असे तालिबानने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आणि कुणीही राजधानीभोवतीच्या परिसरात फिरकू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
नक्की पाहा >> Video: काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी, देश सोडण्यासाठी धडपड; रात्रभर ऐकू येत होते गोळीबाराचे आवाज
अमेरिकी आणि नाटो फौजांनी सुमारे दोन दशके अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केले. तरीही तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर एका आठवडय़ातच ताबा मिळवला. अफगाणी सुरक्षा दलांना अमेरिकी लष्कराची हवाई मदत असतानाही तालिबानने त्यांचा पराभव केला, काही सरकारी सैन्याला आपल्याबरोबर घेतले आणि काहींना पळवून लावले.