स्पॅनिश वृत्तपत्र एल मुंडो, एजन्सी फ्रान्स प्रेस (एएफपी), बीबीसी न्यूज व सीएनएन यांच्या प्रतिनिधींना यंदाचा प्रिक्स बायेक्स काल्वाडोस पुरस्कार जाहीर झाला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार असून सीरिया पेचप्रसंगाच्या वार्ताकनासाठी तो देण्यात आला आहे. एजन्सी फ्रान्स प्रेसचे छायाचित्रपत्रकार अ‍ॅरिस मेसिनिस यांना लिबियातील सिरटे येथे जो संघर्ष झाला त्याच्या छायाचित्रांसाठी गौरवण्यात आले आहे. बीबीसी न्यूजचे जेरेमी ब्राऊन, सीएनएनचे निक रॉबिन्सन व एल मुंडोचे जॅव्हिएर एसपिनोसा यांचा पुरस्कारांच्या मानकऱ्यांत समावेश आहे. मॅग्नम एजन्सीचे प्रमुख गिलेस पेरेस हे आंतरराष्ट्रीय परीक्षक गटाचे प्रमुख होते. गेटी इमेजेसचे पत्रकार एज ओयू यांना इजिप्त क्रांतीवरील लेखासाठी तरुण वार्ताहर पुरस्कार जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afp bbc and cnn representative awarded