दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. जवळपास १४ तासांच्या तपासानंतर सीबीआय़ पथक सिसोदियांच्या घरातून बाहेर पडले. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याविरोधात सीबीआयनं मनीष सिसोदियांसोबत १५ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सिसोदियांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोटाळ्यात सिसोदिया मुख्य आरोपी

सिसोदिया यांनी गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत.

हेही वाचा- SFI नव्हे काँग्रेस कार्यकर्त्यांनीच महात्मा गांधींचा फोटो तोडला, राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणाला वेगळं वळण

सिसोदियांकडून कारवाईचा निषेध

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 14 hours of investigation the cbi team left manish sisodians house dpj