पीटीआय, इम्फाळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वांशिक हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरमध्ये तब्बल २३ वर्षांनी हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. ‘हमर स्टुडंट्स असोसिएश’ (एचएसए) या कुकी समाजातील संघटनेने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मैतेई समाजाचा विरोध डावलून संवेदनशील असलेल्या चुराचंदपूरमधील तात्पुरत्या चित्रपटगृहात हा खेळ झाला.
मैतेई समाजाचे प्राबल्य असलेल्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ या दहशतवादी संघटनेने सप्टेंबर २०००मध्ये संपूर्ण राज्यात हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी लादली होती. संघटनेच्या दहशतीमुळे दोन दशकांपेक्षा अधिक काळ एकाही हिंदी चित्रपटाचा खेळ राज्यात होऊ शकला नव्हता.
अतिरेकी संघटनेची दहशत
१९९८ साली ‘कुछ कुछ होता है’ हा शेवटचा चित्रपट मणिपूरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदी चित्रपटांवर बंदी घातल्यानंतर ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ने सहा ते आठ हजार चित्रफिती, सीडी आणि सिनेमांच्या रिळांची होळी केली होती. संघटनेच्या दहशतीमुळे चित्रपटगृह चालक तसेच केबल चालकांनी एकही हिंदी चित्रपट दाखविला नव्हता.