बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला राम राम ठोकून एनडीएत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ४ जूनच्या निकालानंतर ते पुन्हा एकदा आपली भूमिका बदलणार असल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी केला. ४ जूननंतर नितीश कुमार इंडिया आघाडीत परतणार आहेत, असे भाकीत तेजस्वी यादव यांनी वर्तविले आहे. “वंचिताचे राजकारण आणि पक्ष वाचविण्यासाठी आमचे ‘चाचा’ ४ जूननंतर मोठा निर्णय घेणार आहेत”, असा दावा माध्यमांशी बोलताना त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाशी (RJD) पुन्हा हातमिळवणी करणार का? असा प्रश्न विचारला असता तेजस्वी यादव म्हणाले की, ते जेव्हा मोठा निर्णय घेतील, तेव्हा तुम्हाला दिसून येईलच”

जानेवारी महिन्यात नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करत पुन्हा एकदा एनडीशी युती केलीहोती. यासाठी त्यांनी आरजेडीशी असलेली आघाडी तोडून टाकली. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनीच वर्षभरापासून इंडिया आघाडीची जुळवाजुळव करण्यात पुढाकार घेतला होता. देशभरातील विविध राज्यात जाऊन त्यांनी त्या त्या राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला होता. तसेच इंडिया आघाडीची पहिली बैठकही पाटणा येथे घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र जागावाटपास विलंब आणि इंडिया आघाडीच्या नेतेपदावरून चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांनी आघाडीतून अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारीत स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करणार

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी जेडीयू १६ तर भाजपा १७ जागांवर निवडणूक लढवत आहे. उरलेल्या सात जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. तर इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दल २३ आणि काँग्रेस ९ जागांवर निवडणूक लढवत आहे.

“मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!

नितीश कुमार यांनी एनडीएच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक सभा बिहारमध्ये पार पडली होती. या सभेत बोलताना नितीश कुमार म्हणाले की, मी इकडे, तिकडे गेलो, पण आता पुन्हा एनडीएत आलो आहे आणि आता कायमचा इथेच राहणार आहे. त्यांच्या या वाक्यानंतर पंतप्रधान मोदीही आपले हसू आवरू शकले नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 4 june chacha can take big decision says tejashwi yadav hints at nitish kumar return to india bloc kvg