गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच देशातील लोकप्रिय नेते असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांना सोमवारी केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी मोदींपेक्षा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काम उत्कृष्ठ असल्याचे वक्तव्य रविवारी केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राजनाथसिंह यांनी मोंदींची पाठराखण करून पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले.
मोदी हे माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत. खरेतर ते मला मोठ्या भावासारखे आहेत, असे सांगत शिवराजसिंह चौहान यांनीदेखील आपण भाजपतर्फे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नसल्याचे सोमवारी म्हटले आहे.
अडवानी यांनी रविवारच्या सभेत केलेल्या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ लावल्याचे राजनाथसिंह यांचे म्हणणे आहे. मोदी हेच देशातील लोकप्रिय नेते आहेत, याबद्दल पक्षामध्ये कोणतेही दुमत नसल्याचेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असले, हे संसदीय मंडळचं ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader