हिंगोलीतील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दिल्लीत एक वेडा मुख्यमंत्री बसला असल्याचे म्हणत अरविंद केजरीवालांना टोला मारला.
दिल्ली बलात्कार प्रकरणात हयगय बाळगणाऱया ‘त्या’ तीन पोलिसांच्या निलंबनावरून आंदोलनाला बसले असता आंदोलनाला कुठे बसावे? हे सांगणारे सुशीलकुमार शिंदे कोण? असे म्हणत केजरीवालांनी शिंदेंना लक्ष्य केले होते.
यावर पलटवार करत सुशीलकुमार शिंदेंनी हिंगोलीत एका कार्यक्रमादरम्यान मजेदार किस्सा सांगत केजरीवालांना टोला मारला. शिंदे म्हणाले की, “मी पीएसआय होतो, तेव्हा कामाच्या व्यस्तपणामुळे मला सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे मी हनीमूनलाही जाऊ शकलो नाही. कारण, त्यावेळी मुंबईत दंगल सुरू होती. दिल्लीत वेड्या मुख्यमंत्र्याच्या आंदोलनामुळे दिल्लीतील बहुतेक पोलिसांच्या सुट्ट्या मला रद्द कराव्या लागल्या.” असे म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी केजरीवालांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
दिल्ली पोलीस केवळ लाच गोळा करून गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवतात – केजरीवाल यांचा आरोप
दिल्लीत गुन्हे घडत असताना सुशीलकुमार शिंदेंना सुखाने झोप कशी लागू शकते? महिला सुरक्षित केव्हा होणार? असा सवालही केजरीवालांनी आपल्या आंदोलनादरम्यान, सुशीलकुमार शिंदेंना विचारला होता. तसेच दिल्ली पोलीस केवळ दिल्लीकरांकडून लाच गोळा करून ते आयुक्तांमार्फत गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात, असा घणाघाती आरोपही अरविंद केजरीवालांनी केला होता.
आंदोलनाचे ठिकाण ठरविणारे सुशीलकुमार शिंदे कोण? – केजरीवाल

Story img Loader