Atiq Ahmed Killed: कुख्यात गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये काल (१५ एप्रिल) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्यात पत्रकार असल्याचे भासवत या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. या प्रकारामुळे पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लवकरच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे आणि मानक कार्यप्रणाली (Guidelines and Standard Operating Procedures) जारी करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…

आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते? (फोटो सौजन्य पीटीआय)
आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
hardeep singh nijjar
Hardeep Nijjar Murder : हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण हस्तांतरित!
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Loksatta anvyarth Regarding the implementation of the Right to Information Act Supreme Court
अन्वयार्थ: कुंपणानेच खाल्ले शेत…
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती

शनिवारी (१५ एप्रिल) संध्याकाळी अतिक आणि अशरफ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एसएचओ मौर्या यांच्या नेतृत्वाखालील २० पोलिसांच्या पथकाच्या सुरक्षेत त्यांना मोतीलाल नेहरू झोनल हॉस्पिटलमध्ये (कॉल्विन) वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. यावेळी पोलिसांच्या पथकात सात उपनिरीक्षक आणि १३ हवालदारांचा समावेश होता. हॉस्पिटलच्या गेटवर माध्यमांना पाहिल्यानंतर अतिक आणि अशरफ हळू चालायला लागले. यावेळी पत्रकारांनी दोघांनाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. माध्यमांचे कॅमेरे दोघांकडे लागलेले होते. तेवढ्यात पत्रकारांच्या गर्दीत असलेल्या दोघांनी अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्यावर गोळी लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही हल्लेखोर आणि त्यांचा साथीदार पोलिसांना शरण गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लोखोर दुचाकीने आले होते. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक व्हिडीओ कॅमेरा जप्त केला. तसंच तिथे एका वृत्तवाहिनीचाही लोगो त्यांना सापडला आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दावा केला आहे की, हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफवर गोळीबार केल्यानंतर तिथे ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या होत्या.

हेही वाचा >> का केली अतिक-अशरफ अहमदची हत्या? हल्लेखोरांनी पोलीस तपासात सांगितलं कारण; दोघा भावांचा करत होते पाठलाग!

उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची होणार बैठक

या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कार्यक्रम, सभा, प्रचार रॅली कव्हर करण्याकरता पत्रकार एकत्र जमत असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. पत्रकारांना सुरक्षा पुरवण्याकरता लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

Story img Loader