गुजरातमध्ये बलात्काराचे एक वेगळे प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीने कन्येला जन्म दिल्यानंतर तीनवर्षांनी तिच्या आई-वडिलांनी छोटा उदीपूर पोलीस स्थानकात मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. पिडीत मुलगी रोजकुवा येथील शाळेत आठव्या इयत्तेत शिकत असताना आरोपी दिनेश राठवाने जानेवारी २०१६ मध्ये तिच्यावर बलात्कार केला.

दिनेश राठवाने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिने याबद्दल कुठेही वाच्यात केली नाही. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पालकांना या गुन्ह्याबद्दल समजले. पण त्यावेळी सुद्धा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. छोटा उदीपूर येथील रुग्णालयात मुलीने एक मुलीला जन्म दिला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

डॉक्टर ए.राजू यांच्या मालकीचे हे हॉस्पिटल होते. मुलांच्या तस्करी प्रकरणी डॉक्टर राजू यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार त्यांनी ते नवजात अर्भक डॉक्टर राजू यांच्याकडे सोपवले. त्यांनी ते विकून टाकले. अलीराजपूर पोलीस डॉक्टर राजूने विकलेल्या मुलांच्या मूळ पालकांचा शोध घेत या मुलीपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांना नीट समजावून राजी केल्यानंतर त्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली.

Story img Loader