बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणाला सापाचा दंश झाल्यानंतर तो रुग्णालयात उपचारासाठी जात असताना पोलिसांनी त्याला मध्येच अडवलं. ज्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. कैमूर जिल्ह्यात गुरुवारी ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव रामलखन प्रसाद असे आहे. तरुण उपचारासाठी जात असताना तो मद्यपान करून पळत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सोडण्यासाठी दोन हजारांची लाच मागितली. ज्यात बराच वेळ गेला आणि तरुणाला वेळेत उपचार मिळाले नाहीत.

प्रकरण काय आहे?

कैमूर जिल्ह्यातील तरुणाला सापाचा दंश झाल्यानंतर तो घाईघाईत रुग्णालयात जात होता. मात्र पोलिसांनी गस्तीवर असताना त्याला पकडलं. बिहारमध्ये मद्यबंदी आहे. त्यामुळे अवैधपणे मद्यपान केलेल्या लोकांना शिक्षा दिली जाते. या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि दोन हजारांची लाच मागितली. तरुणाने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले. तीन तासांनी त्याचा मोठा भाऊ आला आणि त्याने ७०० रुपये देऊन कशीबशी त्याची सोडवणूक करून घेतली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शिवशंकर कुमार यांनी मात्र पोलिसांनी लाच घेतल्याचा आरोप फेटाळून लावला.

Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हे वाचा >> तरुणानं सापाचा दोनदा चावा घेतला आणि सापाचा झाला मृत्यू, नेमकं काय घडलं?

कैमूरचे पोलीस अधीक्षक ललित मोहन शर्मा म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तीन दिवसात चौकशीचा अहवाल सादर केला जाईल. जर संबंधित पोलीस दोषी आढळले तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे रामलखन प्रसादच्या कुटुंबियांनी सांगितले की, छनीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडत असलेल्या गावातील शेतात रामलखन काम करत असताना त्याला साप चावला.

कुटुंबियांनी केले धक्कादायक आरोप

यानंतर रामलखन जवळच्या रुग्णालयात धावत जात होता. मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवलं. त्याने अवैधपणे मद्यपान केले असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. रामलखनच्या भावानं सांगितलं की, तो पोलिसांकडे विनवणी करत होता. मात्र पोलिसांनी काहीही न ऐकता त्याच्याकडे दोन हजार रुपये मागितले. त्यात तीन तास वाया गेले, ज्यामुळे माझ्या भावाचा जीव गेला.

हे ही वाचा >> Video: एका वर्षाच्या मुलाने खेळणं समजून सापाला चावलं; पुढे झाला अनर्थ, डॉक्टरही हैराण

भावाने पुढे म्हटले की, जेव्हा मला रामलखनचा फोन आला तेव्हा मीही शेतात काम करत होतो. मी कसेबसे ७०० रुपये गोला केले आणि रामलखन असलेल्या ठिकाणी सायकलवर पोहोचलो. पोलिसांना पैसे देऊन मी रामलखनला घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात पोहोचलो. मात्र तिथे पोहोचताक्षणीच रामलखन जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.