भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘गाढव’ असल्याचे केल्यानंतर आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मोदी ‘दंगा बाबू’ असल्याचे म्हटले आहे.
मोदींचा दंगा बाबू असा उल्लेख करून गुजरात दंगलीवरून ममतांनी मोदींवर जोरदार टीका केली तसेच मोदींच्या नावे ‘पीएम फंड’ जमा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यासंबंधीचे ‘मोदी फॉर पीएम फंड’ नावाचे जाहीरात कार्डही पुरावा म्हणून जनतेसमोर सादर केले. याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तसेच ममता यांनी ‘ते पंतप्रधानपदाची खुर्ची विकायलाही कमी करणार नाहीत’ असा हल्लाही मोदींवर चढवला.
ममत बॅनर्जी म्हणाल्या की, मोदींच्या नावे जमा केला जाणारा निधी ही अवैध पद्धत आहे. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचा फक्त सहायता निधी(रिलिफ फंड) असू शकतो. कोणताही राजकीय पक्ष आपल्या पंतप्रधानपदासाठी निधी कसा काय जमा करू शकते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच याबद्दल निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या आणि वाराणसीत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोदींनी केलेली वक्तव्याचाही निषेध व्यक्त केला. भाजपकडून प्रचारासाठी अपेक्षेपेक्षा जास्त पैसा उधळला जात असून इतका पैसा भाजपला कोण देत आहे? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader