पीटीआय, बीजिंग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या संस्थापकांना भेटण्यासाठी येणाऱ्या टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी भारत दौरा रद्द केल्यानंतर ते तातडीने रविवारी चीनमध्ये दाखल झाले.चीनमधील स्थानिक कंपन्यांच्या ईव्हीची विक्री वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे मस्क यांनी भारताचा दौरा रद्द केल्यानंतर तातडीने चीनला भेट दिल्याचे वृत्त आहे.मस्क यांनी रविवारी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली आणि भविष्यातील विस्तार योजनांवर चर्चा केली, असे सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.

मस्क यांनी ‘चायना कौन्सिल फॉर द प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ (सीसीपीआयटी) च्या निमंत्रणावरून चीनला भेट दिली. त्यांनी सीसीपीआयटीचे अध्यक्ष रेन हाँगबिन यांची भेट घेऊन चीनबरोबर पुढील सहकार्याबाबत चर्चा केली. शांघायमध्ये ७ अब्ज डॉलरचा कारखाना उभारल्यानंतर २०२० मध्ये टेस्लाच्या उत्पादन सुरू झाल्यानंतर टेस्ला ही चीनमधील लोकप्रिय ईव्ही बनली आहे.

हेही वाचा >>>‘एमडीएच’चे मसाले सुरक्षित आहेत का? परदेशात बंदी घातल्यानंतर कंपनीने केला खुलासा

टेस्लाला गेल्या काही वर्षांपासून चिनी ईव्ही निर्मात्यांकडून कठोर स्पर्धेचा सामना करावा लागला आहे. चीनच्या प्रिमियम ईव्ही सेगमेंटमध्ये आपले अग्रगण्य स्थान राखण्यासाठी मस्क यांनी शांघाय-निर्मित वाहनांच्या किमतीत सहा टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After canceling india visit tesla ceo elon musk entered china amy