राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकाऱ्याने पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना स्टेडियम सोडण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील त्यागराज स्डेडियमवर घडलेल्या या प्रकारामुळे प्रशिक्षण घेणारे खेळाडू तसेच त्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून देशभरातून या प्रकरणावरुन खेळासंदर्भातील गांभीर्याबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. असं असतानाच आता हे प्रकरण या आयएएस अधिकारी असणाऱ्या दांपत्याला महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारित येणाऱ्या गृहखात्याने या प्रकरणातील आयएएस दांपत्याची बदली केली आहे. या प्रकरणातील दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिव संजीव खिरवार यांची पोस्टींग लडाखला करण्यात आलीय तर त्यांची पत्नी रिंकू डग्गू यांची अरुणाचलमध्ये बदली करण्यात आलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा