रशियामध्ये एका युद्ध विमान रहिवासी भागामध्ये पडल्याची घटना घडली आहे. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे युद्ध विमान सी ऑफ अझीव्ह प्रांतामधील किनारपट्टीवरील शहरातील एका इमारतीवर पडलं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या अपघातामध्ये नऊ मजली इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सू-३४ हे युद्ध विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. प्रशिक्षणाअंतर्गत केलेल्या उड्डाणादरम्यान या विमानातील दोन इंजिनपैकी एका इंजिनाला आग लागल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे इजेक्ट झाल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र विमान रहिवासी इमारतीवर आदळल्याने विमानातील इंधनाचा स्फोट झाला.

स्थानिक आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक प्रशासनाने या अपघातानंतर जवळच्या रुग्णालयामध्ये काही खोल्या या अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवल्या असून हवाई रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. या अपघातामुळे १७ फ्लॅट्सचं नुकसान झालं आहे. इमारतीमधील १०० नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

यियिस्क इथे रशियन हवाई दलाचा मोठं हवाई तळ असून याच शहरातील इमारतीवर हे विमान आदळले. या शहरामध्ये ९० हजार लोक राहतात. या अपघातासंदर्भात राष्ट्रध्यक्ष पुतिन यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले.

रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.