हाडे गोठवून टाकणारी थंडी काश्मीरमध्ये कायम असून रात्रीचे तापमान अनेक ठिकाणी शून्याच्या खूपच खाली गेले आहे. उंचीवरील भागात या आठवडयात पाऊस पडत असून चार दिवस तापमान जरा वाढले होते, पण ते आता पुन्हा खाली गेले आहे, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.

काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील हवामान विभागाच्या माहितीनुसार गेल्या चार रात्री तापमान गोठणबिंदूच्या खाली म्हणजे उणे २.३ अंश सेल्सियस आहे. तापमान ०.५ अंशांनी उतरले आहे.
कारगिल येथे लडाख भागात सर्वाधिक थंडी होती, तेथे उणे ११ अंश तापमान होते, ते १ अंशाने उतरले. लेह या लडाखमधील भागात तापमान उणे १० अंश होते, ते आधी उणे ८.३ अंश होते.
गुलमर्ग येथील स्कीईंग रिसॉर्टवर तापमान उणे ६.२ अंश होते. उत्तर काश्मीरमध्ये उंचीवरील भागात बर्फ पडत होते. श्रीनगरच्या पठारी भागात पाऊसही झाला, त्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळाला.
काश्मीरमध्ये काझीगुंड येथे तापमान उणे ३.८ अंश सेल्सियस होते. पहलगाम येथे तापमान उणे ५.६ अंश सेल्सियस होते, तर कुपवाडा येथे तापमान उणे ३.५ अंश सेल्सियस होते. कोकेरनाग येथे उणे ०.७ अंश तापमान नोंदले गेले.
पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माहितीनुसार काश्मीरमधील हवामान कोरडे व थंड राहील, तसेच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे २० जानेवारीनंतर पावसाची शक्यता आहे.

Story img Loader