घरवापसी कार्यक्रमावरून वादात सापडलेले भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी आता गायीला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी अभियान चालवण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक भारतीयाची ही इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.हिंदू युवा वाहिनी या आदित्यनाथ यांच्या संघटनेमार्फत हे अभियान चालवले जाणार आहे.  गायीचे संरक्षण व संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. भारतीय संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व असून, कृषीप्रधान अर्थव्यवस्था टिकून राहण्याचे ते महत्त्वाचे असल्याचे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. जगभरात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळणे शक्य नाही, निदान तो भारतात तरी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader