भरधाव वेगाने येणाऱ्याने कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत एका ३० तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. दिपांशू वर्मा असं या मृत्यू झालेल्या तरुणांचं नाव असून मुकूल जखमी तरुणांचं नाव आहे. ३० एप्रिल रोजी दिल्लीच्या केजी मार्ग भागात हा अपघात घडला.
हेही वाचा – Video : पी. टी. उषा यांनी जंतर मंतरवर घेतली आंदोलक खेळाडूंची भेट, नेमकी चर्चा काय?
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० एप्रिल रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास दिपांशू वर्मा आपल्या भावासह दुचाकीने केजी मार्ग भागातून जात होता. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दिपांशू थेट कारच्या छतावर जाऊन पडला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी कारचालकाला याची माहिती दिली. मात्र, त्यांनी कार न थांबवता तीन किमीपर्यंत दिपांशूला ओढत नेले. अखेर त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटजवळ गाडी थांबवत त्याला खाली फेकले.
या घटनेत दिपांशूचा मृत्यू झाला. तर भाऊ मुकूल गंभीर जखमी आहे. मुकूलवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांनी हिट अॅंण्ड रनचा गुन्हा दाखल केला असून कारचालकाचा शोध सुरू आहे.
हेही वाचा – न्यायालयात गोळीबार घडविलेल्या गुंडाचा तिहारमधील हल्ल्यात मृत्यू
दरम्यान, या घटनेनंतर अनेकांना दिल्लीच्या कांझावाला घटनेची आठवण झाली. जानेवारी महिन्यात दिल्लीच्या कांझावाला भागात एका २० वर्षीय तरुणीला कारने चिरडल्याने होते. तसेच तिला १२ किमीपर्यंत फरपटत नेले. या अपघातात तिचा मृत्यू झाला होता.