वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडलीय. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे फ्रिजमध्ये ठेवले तर काही तुकड्यांची विल्हेवाट जंगलात लावली. या धक्कादायक घटनेमुळं देशभरात खळबळ माजली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमध्येही एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिहा बिश्वास असं खून झालेल्या तरूणीचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसी रिहाचा खून केल्यानंतर तिचा प्रियकर किरण डेबनाथने फेसबुक लाईव्ह करत धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर वृत्त असं की, सिलीगुरी पोलिसांना सोमवारी रिहाचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला. रिहाचा खून केल्यानंतर किरणने काही वेळानंतर सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करत स्वत:लाही संपवलं. रविवारी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून किरणने आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. किरण रविवारी रात्री रिहाच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणामुळं वादविवाद झाले. वाद इतका विकोपाला गेला की, किरणने रिहाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.

आणखी वाचा – Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

सिलगुरी येथील नाडीया परिसरात रिहा तिचा पती रोमीयो बिस्वास आणि पाच वर्षांच्या मुलासोबत राहायची. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून रिहा आणि करण यांच्यात प्रेमसंबंध होते. रिहाचा पती घरी नसल्यावर किरण तिला भेटायला यायचा. त्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद झाल्यावर रिहा तिच्या पतीसोबत राहू लागली. दरम्यान, सोमवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांना रिहा तिच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

आणखी वाचा – Viral Video: बघता बघता अजगराने बकरीला विळखा घातला, तीन मुलांनी पाहिलं अन्…; श्वास रोखून धरणारा थरारक व्हिडीओ व्हायरल

रिहाचा खून केल्यानंतर तिचा प्रियकर किरण डेबनाथ नवीन जलपायगुरी रेल्वे स्थानकाजवळ गेला. त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह करून धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. फेसबुक लाईव्ह करत रिहाचा खून केल्याची त्याने कबुली दिली. “तिने मला विनाकारण सोडलं. मी तिचा खून केला नसता, मी स्वत: हे टोकाचं पाऊल उचललं नसतं. पण तिने मला सोडल्यानंतर मी खूप घाबरलो. माझ्या आयुष्यात आता जगण्यासाठी काहीच राहिलं नाही, जर मी जगलो तर उर्वरीत आयुष्य मला तुरुंगात जगावं लागेल,” असं किरणने फेसबुक लाईव्ह करत म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After killing girlfriend lover dies by suicide doing facebook live west bengal murder case nss