भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात सायबर हल्ला झाला होता. अहमदाबादच्या सायबर क्राईम युनिटने हा खुलासा केला आहे. नुपूर शर्मांच्या वक्तव्यावर इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॅकर्सनी जगभरातील इतर हॅकर्सना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. यानंतर भारतावर सायबर हल्ला झाला होता. ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या हॅकर गटांनी सायबर हल्ले सुरू केले आणि जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ले करण्याचे आवाहन केले होते.

अहमदाबादच्या सायबर क्राईम युनिटच्या अधिकार्‍यांनी मलेशिया आणि इंडोनेशिया सरकार आणि इंटरपोलला हॅकर गटांविरुद्ध लुकआउट नोटिस पाठवल्या आहेत. ठाणे पोलीस, आंध्र प्रदेश पोलीस आणि आसाममधील एका वृत्तवाहिनीसह दोन हजारांहून अधिक वेबसाइट हॅक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“जगभरातील मुस्लिमांची माफी मागा” म्हणत हॅकर्सकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक!

एका वृत्तवाहिनीच्या थेट प्रक्षेपणादरम्यान, अंधार झाला आणि पाकिस्तानचा ध्वज दिसत होता. त्याखाली “पवित्र प्रेषित हजरत मोहम्मद यांचा आदर करा” असे लिहिले होते.

सायबर गुन्हेगारांनी नुपूर शर्मांच्या पत्त्यासह त्यांचे वैयक्तिक तपशीलही ऑनलाइन प्रसारित केले होते. अनेक लोकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचे तपशीलही ऑनलाईन लीक झाले आहेत. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर आखाती देशांसह अनेक इस्लामिक देशांनी आक्षेप घेतला होता. यानंतर भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले.

विश्लेषण: भारतीय वेबसाईट्स हॅक करणारे ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’ कोण आहेत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सुप्रीम कोर्टाला खुले पत्र

नुपूर शर्माशी संबंधित वादात ११७ जणांनी सर्वोच्च न्यायालयाला खुले पत्र लिहिले आहे. हे पत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांनी नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या विरोधात लिहिले आहे. हे पत्र १५ माजी न्यायाधीश, ७७ निवृत्त सनदी अधिकारी आणि २५ माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने लक्ष्मणरेषा ओलांडली, असे या पत्रात म्हटले आहे. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्याची मागणी न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

Story img Loader