माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर दिसतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख संघाशी निगडीत एका स्वयंसेवी संस्थेच्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाबाबत अजून औपचारिक घोषणा झालेली नाही. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम २४ ऑगस्टला होणार आहे.
एक महिन्यापूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपूरमधील संघ मुख्यालयात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुखर्जी यांच्या नागपूर दौऱ्यावर राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती. नाना पालकर स्मृती दिवस (एनपीएसएस) ही एक स्वंयसेवी संस्था आहे. जी गरीब रूग्णांसाठी काम करते. या संस्थेने आपल्या वार्षिक कार्यक्रमात रतन टाटांबरोबर संघ प्रमुख मोहन भागवत यांनाही आमंत्रण दिले आहे.
एनपीएसएसचे मुंबईतील टाटा कॅन्सर रूग्णालयाजवळच दहा मजली कार्यालय आहे. टाटा रूग्णालयात इलाजासाठी आलेल्या रूग्णांची देखभाल एनपीएसएसमध्ये केली जाते. दरम्यान, यापूर्वी मोहन भागवत आणि रतन टाटा यांच्यात कधी भेट झालेली नाही. यापूर्वी डिसेंबर २०१६ मध्येही ते संघ मुख्यालयात जाऊन आलेले आहेत. त्यावेळीही त्यांची संघप्रमुखांसोबत दिर्घ चर्चा झाली होती. टाटा ट्रस्ट ही जनकल्याणच्या अनेक कार्यक्रमांशी जोडले गेलेले आहेत.