पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे भाजपा सत्ता स्थापन करणार आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पार्टीने सत्ता काबीज केली आहे. दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे. याचबरोबर आता आम आदमी पार्टीने आपाला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे. हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा ‘आप’ लढवणार आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबत आज शिमला येथे माहिती दिली.

“ ‘आप’ला पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे आम आदमी पार्टीचा उत्साह वाढला आहे. आता आप हिमाचलच्या सर्व ६८ विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. हिमाचलमध्ये आम आदमी पार्टीची भाजपाशी स्पर्धा आहे. काँग्रेसचे कोणतेही आव्हान आम आदमी पार्टीसाठी नाही. भाजपाला हरवण्याचा मंत्र ‘आप’ला माहीत आहे.” असं सत्येंद्र जैन म्हणाले आहेत.

Omar Abdullah
ओमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Arvi Vidhan Sabha Constituency, Arvi Vidhan Sabha Dispute,
आर्वी विधानसभा मतदारसंघाचा वाद दिल्ली दरबारी
Union Minister of State Dr Bharti Pawar is preparing for the Legislative Assembly Election
लोकसभेतील पराभवानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार विधानसभेच्या तयारीला
Future Chief Minister Uddhav Thackeray banner in Shivaji Park area Mumbai print new
भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…; शिवाजी पार्क परिसरात फलकबाजी
Jammu & Kashmir Election Results 2024
काश्मीरमध्ये ओमर मुख्यमंत्री; हरियाणात दसऱ्यानंतर निर्णय
Haryana Assembly Election 2024
Haryana Assembly Election 2024: हरियाणाच्या निवडणुकीत भाजपाने माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना बाजूला का केलं? काय आहे राजकीय गणित?
Konkan Assembly Constituency Vidhan Sabha Election 2024 in Marathi
विधानसभेचे पूर्वरंग: कोकणातील यशावर महायुतीची भिस्त

तसेच, “राज्यातील डॉक्टर आणि सुशिक्षित लोक आम आदमी पार्टीमध्ये सहभागी होत आहेत. ‘आप’ हिमाचलमध्येही शिक्षण आणि आरोग्य मोफत करेल. शिमला महापालिका निवडणूकही लढवणार असून यापूर्वी देखील महापालिका निवडणूक लढवली आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचलमध्ये येणार आहेत.” अशी माहिती देखील जैन यांनी दिली.

आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये ११७ जागांपैकी ९२ जागांवर विजय मिळवला आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

पंजाबमध्ये आपचे केवळ २० आमदार होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पंजाबच्या मतदारांनी ‘आप’ला भरभरून मतदान केलं. आपचे ९२ आमदार निवडून दिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ १८, अकाली दल आघाडीला चार, भाजपा आघाडीला दोन आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे.