इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी राज्यसभेत उमटले. गाझा पट्टीत झालेल्या हल्ल्यासंबंधी केंद्र सरकारने अधिकृत भूमिका मांडण्यासाठी या विषयावर चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. मात्र सरकारने या मुद्दय़ावर चर्चेस नकार दिला. लोकसभेत या विषयावर चर्चा झाली होती, परंतु इस्रायलच्या निषेधाचा ठराव मांडण्यास सरकारने नकार दिला होता. त्याची पुनरावृत्ती राज्यसभेत झाली. राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनीदेखील नियम १७७ अंतर्गत चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली असल्याचे सांगितले. मात्र आजच्या कामकाजात समावेश नसल्याने नंतर ही चर्चा घेण्यात येईल, असे आश्वस्त करून चर्चा न करण्याची सत्ताधाऱ्यांची विनंती अन्सारी यांनी फेटाळली. इस्रायल-पॅलस्टाइन मुद्दय़ावर सोमवारी राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Story img Loader