काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनंतर आता प्रियंका गांधी वाड्रा यांनाही कोविडची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रियंका यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे म्हटले आहे. प्रियंका यांनी सांगितले की त्यांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्या सर्व करोना प्रोटोकॉलचे पालन करत आहे. अलीकडच्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुरुवारी सोनिया गांधीही करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली होती. रणदीप सुरजेवाला म्हणाले होते की, सोनिया गांधींनी यापूर्वी ज्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यापैकी अनेकांनाही करोनाची लागण झाली आहे. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या होत्या.

पंतप्रधान मोदींच्या सोनियां गांधीना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, बुधवारीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. सोनिया गांधींना ८ जून रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, आता सोनिया गांधींना करोनाची लागण झाल्यामुळे ही चौकशी होणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.