सन्डे टाइम्स या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून ललित मोदी यांच्या प्रवास कागदपत्रांना मंजुरी दिल्याचे म्हटले आहे.
आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी ललित मोदी यांना भारतात येण्यासाठी पारपत्र (ट्रॅव्हल व्हिसा) मिळवून देण्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली होती. २०१३ मध्ये सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या असताना त्यांनी ललित मोदींची मदत केल्याचा गौप्यस्फोट सन्डे टाइम्सने केला आहे. या प्रकरणी ललित मोदींना व्हिसासाठी मदत करणारे ब्रिटनमधील खासदार केथ वॅझ यांनीही चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
“ललित मोदी यांच्या पत्नी कर्करोगाने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर ४ ऑगस्टला पोर्तुगालमध्ये शस्त्रक्रिया करणार येणार होती. त्यामुळे मी माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना भारतात येण्याची परवानगी दिली होती.”, अशी प्रतिक्रिया सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली. दरम्यान, काँग्रसचे नेते दिग्विजय सिंग यांनी यावर सुषमा स्वराज यांनी खुलासा करून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

Story img Loader