भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीर महत्वाचा मुद्दा आहे. तिथे मानवधिकाराचे उल्लंघन झाले आहे असे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले. भारत-पाकिस्तान दोघांनी चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे इम्रान यांनी म्हटले आहे.
भारता बरोबर संबंध सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पाऊल पुढे टाकू असे इम्रान खान म्हणाले. भारताची इच्छा असेल तर आपण चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवू शकतो. उपखंडासाठी ते चांगले राहिल असे इम्रान म्हणाले.
I was saddened by the way Indian media recently projected me. I am one of those Pakistanis that wants good relations with India, if we want to have a poverty free subcontinent then we must have good relations and trade ties: Imran Khan pic.twitter.com/zDNsoPucR4
— ANI (@ANI) July 26, 2018
निवडणुकीच्या आधी भारतीय प्रसारमाध्यमांनी मी बॉलिवूडचा विलन असल्यासारखी माझ्यावर चिखलफेक केली होती. त्याने आपल्याला दु:ख झाले असे इम्रान खान यांनी सांगितले. भारता बरोबर चांगल्या संबंधांची इच्छा बाळगणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी मी एक आहे.
भारता बरोबर व्यापारी संबंध विकसित करणार असल्याचे इम्रान यांनी सांगितले. भारत-पाकिस्तानमध्ये जितका व्यापार वाढेल तितके संबंध सुधारतील. दोन्ही देशांना या व्यापारी संबंधांचा फायदा होईल असे इम्रान म्हणाले. आपल्याला गरीबी मुक्त उपखंड हवा असेल तर भारता बरोबर चांगले व्यापारी संबंध असले पाहिजेत असे इम्रान म्हणाले.