संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याचा मृतदेह सरकारने त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली केला असता तर ते योग्य ठरले असते, असे मत जनता दलचे (यू) अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे.
अफझल गुरूचा मृतदेह ताब्यात घेण्याचा त्याच्या कुटुंबीयांचा कायदेशीर अधिकार आहे, त्यामुळे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावयास हवा होता, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना कल्पना देण्यात आली होती. असे असताना गुरू याच्या कुटुंबीयांना फाशीची कल्पना का देण्यात आली नाही, असा सवाल यादव यांनी केला. सरकारने संवेदनशीलतेने गुरूच्या फाशीचा प्रश्न हाताळला नाही, असेही यादव म्हणाले.
गुरू याला फासावर लटकविण्याच्या निर्णयाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना स्पीड पोस्टद्वारे कळविण्यात आली त्याबद्दलही यादव यांनी सरकारवर टीका केली. गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर स्पीड पोस्टने त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती मिळाली, असेही ते म्हणाले.
अफझल गुरूचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करावयास हवा होता -यादव
संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याचा मृतदेह सरकारने त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली केला असता तर ते योग्य ठरले असते, असे मत जनता दलचे (यू) अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे. अफझल गुरूचा मृतदेह ताब्यात घेण्याचा त्याच्या कुटुंबीयांचा कायदेशीर अधिकार आहे, त्यामुळे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावयास हवा होता, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
First published on: 20-02-2013 at 02:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afzal gurus body should be handed over to family sharad yadav