संसदेवर हल्ला करण्याच्या काही मिनिटेअगोदरच अफझलने आत्मघातकी दहशतवाद्याशी संपर्क साधला होता, हा त्याचा हल्ल्यात सक्रिय सहभाग असल्याचा ठोस परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
संसदेवर हल्ला होण्यापूर्वी गुरू याच्या भ्रमणध्वनीवर मोहम्मद नावाच्या दहशतवाद्याकडून १०.४३, ११ आणि ११.२५ वाजता संपर्क साधण्यात आला होता. या भ्रमणध्वनीवर करण्यात आलेल्या संभाषणाची शब्दांकित प्रत उपलब्ध करण्यात आली होती. जी योजना आखण्यात आली आहे ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत, असे मोहम्मद याने गुरूला सांगितल्याचे या शब्दांकित मसुद्यावरून स्पष्ट होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

Story img Loader