Aga Khan dies : अब्जावधींचं दान करणारे धर्मगुरु आगा खआन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क या त्यांच्या संस्थेने हे वृत्त दिलं आहे. लिस्बन या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या बरोबर होते असंही या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान आगा खान यांच्या निधनाचं वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट काय?

प्रिन्स करीम आगा खान चौथे यांचं निधन झालं आहे. एक दूरदृष्टी असलेला आणि समाजाप्रति कनवाळू भाव, दयाभाव असलेला माणूस जगातून निघून गेला आहे. समाजसेवा हे त्यांनी त्यांचं व्रत मानलं. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, महिला शक्ती या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान दिलं. त्यांचे विचार कायमच प्रेरणा देत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहेत. सहवेदना! अशा आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

कोण होते आगा खान चौथे

१३ डिसेंबर १९३६ या दिवशी आगा खान चौथे यांचा जन्म झाला होता. अली खान आणि जोआन यार्ड बुलर या दाम्पत्याचे ते पुत्र आहेत. त्यांचं बालपण नैरोबी या ठिकाणी गेलं. तिथे त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात आलं आहे. तसंच त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अश्वपालनाचा व्यवसायही केला होता. १९६४ मधल्या हिवाळ्यात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ते इराणचे प्रतिनिधी म्हणून स्किईंगमध्ये सहभागी झाले होते. त्यांना वास्तुशास्त्राचीही खूप आवड होती. आगा खान यांच्या मागे त्यांची तीन मुलं, एक मुलगी तसंच नातवंडं असं कुटुंब आहे.

आगा खान चौथे यांना मानलं जातं मोहम्मद पैगंबरांचे वंशज

आगा खान चौथे यांना मोहम्मद पैगंबराचे वंशज मानलं जातं. त्यांच्या आजोबांनी इस्माइली मुस्लिमांच्या धर्मगुरु पदावर त्यांची नियुक्ती केली होती.त्यांच्यावर आधुनिक संस्कार झाले होते त्यामुळे ते इस्माइली मुस्लिमांचे नेतृत्व करु शकतील असं त्यांच्या आजोबांना वाटलं होतं त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला होता. आगाखान चौथे हे यशस्वी उद्योजक होते आणि दानशूर वृत्तीचे होते.