संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अफजल गुरूचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात यावा, या मागणीसाठी काश्मीरमधील काही गटांकडून शुक्रवारी निदर्शने करण्यात येणार होती. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यातील काही भागात प्रशासनातर्फे संचारबंदी अथवा लोकांना घराबाहेर पडण्यावर र्निबध घालण्यात आले.
श्रीनगर शहरातील ११ पोलीस ठाण्यांत व खोऱ्यातील काही भागात सावधगिरीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आल्याचे पोलीस प्रवक्त्याने म्हटले आहे. शहरातील १६ पोलीस ठाणी सोडून खोऱ्यात सर्वत्र १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
दिल्लीतील तिहार तुरुंगात ९ फेब्रुवारी रोजी संसदेवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरू याला फाशी देण्यात आली होती. त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात यावा, या मागणीसाठी हुर्रियत कॉन्फरन्स आणि जम्मू काश्मीर मुक्ती संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार होती. त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader